राजन साळवींनी शिवबंधन तोडले, धनुष्यबाण हाती घेणार

12 Feb 2025 17:21:19
 
RAJAN-SALVI
मुंबई : (Rajan Salvi) कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या म्हणजे १३ फेब्रुवारीला ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
 
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, हा पक्षप्रवेश लांबणीवर गेला होता. अखेर उद्या हा पक्षप्रवेश होणार आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
Powered By Sangraha 9.0